धाडसाचे दुसरे नाव मुंबई पोलीस...
भाऊबीज च्या दुसऱ्या दिवशी काळाचौकी येथे एका तरुणाने एका तरुणीवर धारदार हत्याराने वार केले प्राथमिक माहिती मिळता असं समजले की, हे दोघं तरुण-तरुणी चिंचपोकळी काळाचौकी दत्ताराम लाड, या मार्गावरून शुक्रवारी ११.०० वाजता काळाचौकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चिंचपोकळीच्या दिशेने जात होते अचानक त्या तरुणाने धारदार शस्त्राने तिच्यावर वार करण्यास सुरुवात केली स्वतःचा जीव वाचवा म्हणून ती तरुणी धावत धावत जवळच्या आस्था नर्सिंग होम मध्ये शिरली रस्त्यावरील येणारे जाणारे स्थानिक तरुण तिला सोडवण्याचा प्रयत्न करीत होते. चाललेली धावपळ लक्षात येता कर्तव्यावर असणारे भायखळा डिव्हिजनचे वाहतूक पोलिस हवालदार किरण सूर्यवंशी यांनी प्रसंगावधान राखून लागलीच त्या मुलीला बाहेर ओढलं त्या तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला असता. त्याने स्वतःचा गळा चिरला, काळाचौकी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त आर. रागसुधा व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि त्या तरुण तरुणीला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई पोलीस दलात अशा बहादूर जवानांची गरज आहे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जी बहादुरी त्यांनी दाखवली खरोखर वाखाण्याजोगे आहे.
सौजन्य : पोलीस वार्ताहर
संतोष बाईत (गुन्हे वार्ताहर)
Most Popular News of this Week
क्राईम ब्रांच कक्ष - १२
बेकायदेशीर सीडीआर, एसडीआर व लोकेशन पुरविणाऱ्या टोळीतील आरोपींना झारखंड,...
कुरार पोलीस ठाणे, मुंबई
कुरार पोलीस ठाणे, मुंबईदिनांक - १४/१०/२०२६मोटार स्कूटर चोरी करणाऱ्या चोरास...
बोगस डॉक्टरांवर मुंबई क्राईम...
वैद्यकीय पदवी व परवाना नसताना अवैध व्यवसाय करणाऱ्या १० बोगस डॉक्टर...
अंमली पदार्थ विरोधी कक्ष,...
पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि., मुंबई ...
