क्राईम ब्रांच कक्ष - १२
बेकायदेशीर सीडीआर, एसडीआर व लोकेशन पुरविणाऱ्या टोळीतील आरोपींना झारखंड, बिहार येथून अटक करून कारवाई केल्याबाबत.....
गु.प्र.शा., गु.र.क्र. ६८/२०२६ कलम ३१८(२), ३१९(२), २०४, २२३, ३५१(२), ११२(२), २३८, ३(५) भा.न्या.सं. सह कलम ४३(अ), ६६, ६६(क) माहिती तंत्रज्ञान कायदा (ओशिवरा पोलीस ठाणे गु.र.क्र. ९३५/२०२६)
ओशिवरा पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणारा एक इसम कोणत्याही शासकीय पदावर नसताना, “चोरी अगर गहाळ झालेले मोबाईल फोन हस्तगत करून देण्यात येईल” अशा आशयाची जाहिरात स्वतःच्या इंस्टाग्राम आयडीवरून पोस्ट करीत होता.
सदर जाहिरात पाहून ज्या लोकांचे मोबाईल गहाळ अथवा हरविले आहेत असे लोक त्या जाहिरातीमध्ये नमूद असलेल्या आरोपीच्या मोबाईल क्रमांकांशी संपर्क करत होते. नमूद आरोपी इसम हा संपर्क केलेल्या लोकांना तो कोणत्याही शासकीय पदावर नसताना, तो पोलीस विभागामध्ये “इन्स्पेक्टर संजय” असल्याचे भासवून त्यांना त्यांचा मोबाईल हस्तगत करण्याकरिता त्यांच्याकडून पैसे घेऊन बेकायदेशीररीत्या सीडीआर, एसडीआर, लोकेशन इत्यादी माहिती प्राप्त करीत असल्याबाबत गु.प्र.शा., गु.अ.वि. कक्ष १२, दहिसर मुंबई यांना गोपनीय माहिती मिळाली होती.
नमूद माहितीवरून दिनांक २२/०६/२०२६ रोजी कक्ष-१२ च्या पथकाने आयेशा टॉवरच्या प्रवेश गेट जवळ, एचपी पेट्रोल पंपासमोर, एस.व्ही. रोड, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई या ठिकाणी सदर आरोपीस ताब्यात घेतले. त्याचेकडे मिळून आलेल्या दोन मोबाईलमधून तो वर नमूद प्रमाणे मोबाईल हस्तगत करण्याकरिता त्याच्या संपर्कातील आरोपींकडून मोबाईल क्रमांकांचे बेकायदेशीरपणे एसडीआर, लोकेशन तसेच सीडीआर प्राप्त करीत असल्याचे दिसून आले. त्यावरून नमूद प्रकरणी कारवाई करून आरोपीविरुद्ध गु.प्र.शा., गु.र.क्र. ६८/२०२६ कलम ३१८(२), ३१९(२), २०४, २२३, ३५१(२), ११२(२), २३८, ३(५) भा.न्या.सं. सह कलम ४३(अ), ६६, ६६(क) माहिती तंत्रज्ञान कायदा (ओशिवरा पोलीस ठाणे गु.र.क्र. ९३५/२०२६) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये कक्ष १२ चे पथकाने सीडीआर, एसडीआर, लोकेशन पुरविणारे अपर लिंक मधील एकूण ०९ आरोपी निष्पन्न केले असून त्यातील महाराष्ट्र, झारखंड, बिहार येथून ०५ आरोपी अटक करण्यात आले आहेत.
सदर आरोपींपैकी दोन आरोपी हे झारखंड व बिहार पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई या पदावर कार्यरत आहेत. सदर गुन्ह्याचे आजपर्यंतच्या तपासामध्ये आरोपींनी ५० कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), ५२० पेक्षा जास्त सबस्क्रायबर डिटेल रेकॉर्ड (SDR), ५५० पेक्षा जास्त मोबाईल क्रमांकांचे लोकेशन व ४२० पेक्षा जास्त आयएमईआय क्रमांकांची माहिती पुरविली असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपींकडून एकूण ०७ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त, श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे), श्री. अनिल कुंभारे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. कृष्णकांत उपाध्याय, मा. पोलीस उप आयुक्त प्रकटीकरण-१, श्री. नवनाथ ढवळे,
मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-उत्तर), श्री. सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप येडे-पाटील, पो.नि. बाळासाहेब राऊत, पो.नि. पूजा खांडेकर, पो.नि. विजय रासकर, स.पो.नि. समीर मुजावर, स.पो.नि. युवराज चव्हाण, स.पो.नि. कैलास सोनावणे, पो.उप.नि. किरण कोते, पो.उप.नि. अजय सावंत, सफौ सुनील चव्हाण, सफौ. बाळकृष्ण लिहमण, सफौ. संतोष राणे, सफौ. कल्पेश सावंत, पोहवा. संतोष बने, पोहवा. प्रसाद गोरुले, पोहवा. विजय पवार, मपोश. समृद्धी गोसावी, पोह. हरिचंद्र भोसले, मपोश अर्पिता पडवळ, पोशि चंद्रकांत शिरसाठ, पोशि. स्वप्नील चंदनशिवे यांनी पार पाडलेली आहे.
Most Popular News of this Week
क्राईम ब्रांच कक्ष - १२
बेकायदेशीर सीडीआर, एसडीआर व लोकेशन पुरविणाऱ्या टोळीतील आरोपींना झारखंड,...
कुरार पोलीस ठाणे, मुंबई
कुरार पोलीस ठाणे, मुंबईदिनांक - १४/१०/२०२६मोटार स्कूटर चोरी करणाऱ्या चोरास...
बोगस डॉक्टरांवर मुंबई क्राईम...
वैद्यकीय पदवी व परवाना नसताना अवैध व्यवसाय करणाऱ्या १० बोगस डॉक्टर...
अंमली पदार्थ विरोधी कक्ष,...
पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि., मुंबई ...
