अंमली पदार्थ विरोधी कक्ष, घाटकोपर युनिट

अंमली पदार्थ विरोधी कक्ष, घाटकोपर युनिट

पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि., मुंबई

  बेकायदेशीर गांजा या अंमली पदार्थाची ओरिसा येथून आणून मुंबईमध्ये विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केल्याबाबत.

  दिनांक १३/१०/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, घाटकोपर युनिटच्या पथकाने गस्ती दरम्यान सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड ब्रिज जवळ, लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकाबाहेरील गार्डन जवळ, टिळकनगर, चेंबूर (पू) मुंबई या ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री जवळ बाळगणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्या घेतलेल्या झडती मध्ये त्याचे ताब्यातून २२ किलो ९६० ग्रॅम वजनाचा ‘गांजा’ हा अंमली पदार्थ मिळून आल्याने त्याचे विरुद्ध अं.प.वि.कक्ष गु.र.क्र. ९५/२०२६ (टिळकनगर पो.ठा. गु.र.क्र. ५६६/२०२६) कलम ८(क) सह २०(क) एन.डी.पी.एस. कायदा १९८५ अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. नमूद अटक आरोपीताकडे केलेल्या तपासादरम्यान त्याने सदरचा अंमली पदार्थ ओरिसा राज्यातून आणला असून तो विक्रीकरिता मुंबई आला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

अटक आरोपी - मनिषकुमार बैजनाथ चौधरी, वय २५ वर्षे

  उपरोक्त नमूद आरोपीकडून २२ किलो ९६० ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ किं. अं. ११,४८,०००/- चा जप्त करण्यात आलेला आहे.

  सदरची यशस्वी कामगिरी ही श्री. देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री. अनिल कुंभारे, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), श्री. कृष्णकांत उपाध्याय, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्रीमती पौर्णिमा चौगुले-शृंगी, पोलीस उप आयुक्त, अं.प.वि.कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई व श्री. सुधीर हिर्डेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली

  अं.प.वि.कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई अंतर्गत घाटकोपर युनिटचे व.पो.नि. श्री. श्रीकांत आदाटे यांच्या नेतृत्वात स.पो.नि. गणेश वाघ, पो.उ.नि. पंकज पाटील, पो.ह. गोरे, कानडे, यशवंत, रावते, शिंदे, गोमासे, पो.शि. पंडित, गर्जे, साठे, मपोहो कोरपे, मपोशि मुलाणी, विशे, पोहवा.घाडगे यांनी केली आहे.


Most Popular News of this Week

क्राईम ब्रांच कक्ष - १२

बेकायदेशीर सीडीआर, एसडीआर व लोकेशन पुरविणाऱ्या टोळीतील आरोपींना झारखंड,...

कुरार पोलीस ठाणे, मुंबई

कुरार पोलीस ठाणे, मुंबईदिनांक - १४/१०/२०२६मोटार स्कूटर चोरी करणाऱ्या चोरास...

अमली पदार्थ विरोधी कक्ष,...

  अमली पदार्थ विरोधी कक्ष, वांद्रे, गुन्हे                     ...

बोगस डॉक्टरांवर मुंबई क्राईम...

वैद्यकीय पदवी व परवाना नसताना अवैध व्यवसाय करणाऱ्या १० बोगस डॉक्टर...

अंमली पदार्थ विरोधी कक्ष,...

पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि., मुंबई ...