बेकायदेशीर हायड्रो गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगारास अटक
पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष,गुन्हे शाखा,गु.अ.वि., मुंबई
बेकायदेशीर हायड्रो गांजा अंमली पदार्थ जवळ बाळगून विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केल्याबाबत.
दिनांक ३०/०९/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, घाटकोपर युनिटच्या पथकाने गस्ती दरम्यान पी.डब्ल्यू.डी. मैदान बस स्टॉप चे जवळ, वीर माता जिजामाता भोसले मार्गावर, मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवर छेडानगर, चेंबुर, मुंबई याठिकाणी अंमली पदार्थाची विक्री जवळ बाळगणाऱ्या इसमास ताब्यात घेवुन त्याच्या घेतलेल्या झडती मध्ये त्याचे ताब्यातून ०२ किलो ४५१ ग्रॅम वजनाचा हायड्रो गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आल्याने त्याचे विरुद्ध अं.प.वि.कक्ष गु.र.क्र. ९१/२०२६ (टिळकनगर पो.ठा. गु.र.क्र. ३७/२०२६) कलम ८(क) सह २०(ब) एन.डी.पी.एस. कायदा १९८७ अन्वये गुन्हा नोंद करुन अटक करण्यात आली.
अटक आरोपी - मारिअप्पा पेरिआनंद देवेंद्र, वय ४० वर्ष
सदरची यशस्वी कामगिरी ही श्री. देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री. अनिल कुंभारे, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), श्री. कृष्णकांत उपाध्याय, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्रीमती पोर्णिमा चौगुले- श्रींगी, पोलीस उप आयुक्त, अं.प.वि.कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई व श्री. सुधीर हिरडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली अं.प.वि.कक्ष, गुन्हे शाखा, मुंबई अंतर्गत घाटकोपर युनिटचे व.पो.नि. श्री. श्रीकांत आदाटे यांचे नेतृत्वात पो.नि. अभिजीत अहिरराव, स.पो.नि. गणेश वाघ, पो.उ.नि. संदिप रहाणे, पो.उ.नि. पंकज पाटील, पो.ह. दिप यशवंते, पो.शि. गर्ज, मपोशि मुलाणी, मपोशि विशे, पो.ह. चा वाडिले यांनी केली आहे.
Most Popular News of this Week
क्राईम ब्रांच कक्ष - १२
बेकायदेशीर सीडीआर, एसडीआर व लोकेशन पुरविणाऱ्या टोळीतील आरोपींना झारखंड,...
कुरार पोलीस ठाणे, मुंबई
कुरार पोलीस ठाणे, मुंबईदिनांक - १४/१०/२०२६मोटार स्कूटर चोरी करणाऱ्या चोरास...
बोगस डॉक्टरांवर मुंबई क्राईम...
वैद्यकीय पदवी व परवाना नसताना अवैध व्यवसाय करणाऱ्या १० बोगस डॉक्टर...
अंमली पदार्थ विरोधी कक्ष,...
पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि., मुंबई ...
