सांताक्रूझ पोलीस स्टेशन, मुंबई
फिर्यादी - सलमान फारुक शाह
-: घटनास्थळ :-
सेंट रॉकचर्च,कुंची कुरवे नगर,कलिना,सांताक्रुझ पूर्व,मुंबई
-: गुन्हा घडला तारीख व वेळ :-
३०/०९/२०२६रोजी मध्यरात्री ०१.३० च्या सुमारास
- : थोडक्यात हाकिकत :-
दि.३०/०९/२०२६ रोजी मध्यरात्री ०१:३० वाजेच्या सुमारास फिर्यादी व त्याचा भाऊ नामे दिलशाद शाह व फिर्यादीचे मित्र नामे मोहम्मद सोहेल ईशारतअली शाह, समीर कमाल शाह, अस्लम समशुद्रदीन शाह, रवी प्रमोदकुमार साकेत असे ते सर्वजण सेंट रॉकचर्च, कुंची कोरवी नगर, कलीना, सांताक्रुझ पुर्व, मुंबई येथील पायऱ्यांवर बसले होते .फिर्यादीला भुक लागल्याने तो त्यांचे घर किस्मत नगर, कुर्ला पश्चिम, मुंबई येथे जेवण्याकरीता गेले असताना त्यावेळी फिर्यादीच्या ओळखीचा मुळगावा कडील मित्र अरबेज शाह याने त्याना फोन करुन शिवीगाळ करुन फोनवरच भांडण करीत असल्याने त्याच्या फेसबुक आयडी वरुन फ्री फायर ऑनलाईन गेम बाबतचे आयडीचे वाद मिटविण्याकरी फिर्यादीने त्यांचा भाऊ दिलशाद यांचा मोबाईल नंबर दिला होता. त्यानंतर थोड्याच वेळाने फिर्यादीचा भाऊ दिलशाद याला फोन केला असता तेव्हा समीर याने फोन उचलुन सांगितले की, दिलशाद का गला अरबाजने चाकु से काट दिया। तेव्हा फिर्यादी हा रस्त्याने कलिनाच्या दिशेने येत असताना एक अॅम्बुलस आली त्यात फिर्यादीचा भाऊ दिलशाद व इतर त्यांचे मित्र परवेज व अरबाज होते. त्यावेळी दिलशाद यांच्या गळयावर गंभीर जखमा होवुन रक्त वाहत असल्याचे दिसुन आले. त्यावेळी परवेज व अरबाज याने सांगितले की, दिलशाद यांच्या गळयावर अरबेज याने चाकु ने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरुन यातील आरोपी नामे अरबाज शाह याची फेसबुक आयडी फिर्यादी व त्याचा भाऊ वापरुन ऑनलाईन गेम खेळत असल्याचा गैरसमज निर्माण होवुन तो चिडुन जावुन त्याने फिर्यादीचा भाऊ दिलशाद यांच्या गळयावर चाकुने जबर वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन फिर्यादीची आरोपी नामे अरबेज शाह, मुसाहिद वकील अहमद खान, कौसर आली जमील शहा, अनस सय्यद यांच्याविरुध्द 109,118(1),351(3),352,3(5) BNS प्रमाणे तक्रार नोंद आहे
Arrested Accused :- 1) मुसाहिद वकील अहमद खान
2) अरबेज शाह
3) कौसर अली जमेल शाह
Most Popular News of this Week
क्राईम ब्रांच कक्ष - १२
बेकायदेशीर सीडीआर, एसडीआर व लोकेशन पुरविणाऱ्या टोळीतील आरोपींना झारखंड,...
कुरार पोलीस ठाणे, मुंबई
कुरार पोलीस ठाणे, मुंबईदिनांक - १४/१०/२०२६मोटार स्कूटर चोरी करणाऱ्या चोरास...
बोगस डॉक्टरांवर मुंबई क्राईम...
वैद्यकीय पदवी व परवाना नसताना अवैध व्यवसाय करणाऱ्या १० बोगस डॉक्टर...
अंमली पदार्थ विरोधी कक्ष,...
पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि., मुंबई ...
